महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान; 23 नोव्हेंबरला मतमोजणी

15 Oct 2024 16:09:14
election commission of India 
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या.
 
असे असेल वेळापत्रक...
 
अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणी - 23 नोव्हेंबर
Powered By Sangraha 9.0