विक्रांत पाटील यांची विधान परिषदेवर , पनवेलमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी

16 Oct 2024 17:56:44
 panvel
 
पनवेल | भाजपचे प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पाटील यांनी संघटनेत केलेले काम आणि एकनिष्ठतेचे फलश्रुती म्हणजे आमदारकीअसे मानली जाते. यामुळे पनवेल भाजपाला आणखी बळ मिळाले असून त्यांच्या समर्थकांनी दिवाळीपूवच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
 
रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप काँग्रेस दोन प्रमुख पक्ष होते. त्यानंतर शिवसेना सुद्धा या परिसरामध्ये वाढली होती. या कालावधीमध्ये बाळासाहेब पाटील यांनी भाजपाचे नेतृत्व केले. प्रतिकूल परिस्थिती आणि अडचणीच्या काळात त्यांनी पक्षाचे काम केले. गेल्या दशकांपासून पनवेलसह रायगड जिल्ह्यात कमळ फुलले आहे. इतर पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये आले.
 
मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षाने बाळासाहेब पाटील यांना कोकण म्हाडाचे सभापतीपद दिले. त्याचवेळी त्यांचे चिरंजीव विक्रांत पाटील यांना पनवेलचे उपमहापौर होण्याची संधी दिली. विक्रांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये अत्यंत प्रभावी काम केले.
 
दरम्यान विधान परिषदेसाठी अनेक नेते आणि दिग्गज वेटिंग वर असताना भारतीय जनता पक्षाने विक्रांत पाटील यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला विधान परिषदेमध्ये संधी देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
 
 
Powered By Sangraha 9.0