सेझ प्रकल्पग्रस्त विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकणार , उरण, पनवेल, पेण तालुक्यातील शेतकर्‍यांचा इशारा

16 Oct 2024 17:00:48
 alibag
 
अलिबाग | महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी लवकरात लवकर परत करा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सेझ विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. सेझसाठी घेतलेल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी उरण, पेण, पनवेल परिसरातील शेतकर्‍यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले आहे.
 
महामुंबई सेझ कंपनीने उरण, पनवेल, पेण तालुक्यांमधील जमीन प्रकल्पाकरिता खरेदी केल्या. सेझ प्रकल्प स्थापन करण्यापूर्वी विकास आयुक्त (उद्योग) यांच्या आदेशानुसार सेझ कंपनीने खरेदी केलेल्या जमीन मिळकती पंधरा वर्षांमध्ये त्यावर प्रकल्प उभान केल्यास शेतकर्‍यांना मूळ किमतीला परत कराव्या लागतील, असे म्हटले होते. महामुंबई सेझ कंपनीने जमीनी घेऊन जवळजवळ सतरा वर्षे होऊन गेली आहेत.
 
त्यामुळे अ‍ॅड. कुणाल दत्तात्रेय नवाळे यांनी. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रायगड जिल्हाधिक ारी यांना येत्या चार आठवड्यांमध्ये सदर प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यावर रायगड जिल्हाधिकार्‍यांनी अजूनही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी जिलााधिकारी या कार्यालयसमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे.
 
आमच्या जमिनी शासनाने परत कराव्यात अन्यथा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने सहा आठवड्यात याबाबत निर्णय करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी प्रतिक्रिया रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0