सुत्रधार सुख्या शुटरला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी , सलमान खान निवासस्थान फायरिंग प्रकरण..

23 Oct 2024 13:28:32
 karjat
 
पनवेल | बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचणे तसेच त्याच्या घरावर फायरींग करून सलमान खानला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीतील मुख्य आरोपीला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुखबिर बलबिर सिंग उर्फ सुख्या शुटर असे त्याचे नाव आहे.
 
१४ एप्रिल २०२४ रोजी काही संशयित आरोपीनी सिने अभिनेता सलमान खान यांच्या मुबई येथील राहत्या घरावर फायरींग करून सलमान खान ला मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना घडल्या नंतर मुंबई पोलीस तसेच नवी मुंबई पनवेल पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली होती. या टोळीचा सुत्रधार सुख्या शुटर पोलिसांना चकवा देण्यात वारंवार यशस्वी होत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पनवेल शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0