दिघी | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन गरोदर करणार्या तरुणाविरोधात दिघी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्ले आदिवासीवाडी येथील या मुलीसोबत सदर तरुणाने मैत्री केली.
सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या अजाणतेचा गैरफायदा घेत तो तिच्या घरी यायचा आणि एकटी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.