अलिबाग । गोल्डप्लॅग नावाचे बनावट सिगारेट बनवण्याचा कारखाना रायगड कॉईम
उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 कोटी 94 लाख 46 हजार 960 रुपयांचा मुद्येमाल जप्त केला असून 15 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथा घार्गे यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील सांगवी गावाजवळ अब्बास नावाचे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये बनावट सिगारेट बनवण्याचे काम सुरु असल्याची माहिती रायगड क्राईम बँचचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली होती. त्यानुसार खाडे यांचे पथक कामाला लागले. या पथकाला सांगवी गावाजवळ त्यांना नदीच्या काठावर एक अलिशान फार्महाऊस दिसून आले.
चारही बाजूनी उंच तटबंदी असलेल्या या फार्महाऊसची पाहणी केली असता, एका मोठ्या गाळ्यामध्ये गोल्डप्लॅग कंपनीच्या नावाने सिगारेट बनवण्याचे काम सुरु होते. या कारखान्यात सिगारेट निर्मिती करण्याकरीता लागणारी कच्चा माल, अॅटोमॅटिक तीन मशीन जप्त केली आहे.
निर्माण केलेली बनावट सिगारेट पॅकेटमध्ये पॅक करून पॅकेटचा बॉक्स व सदर बॉक्सचे मोठे कॅरेट पॅक केलेले मोठ्या प्रमाणावर आढळुन आले. याची किंमत सुमारे 2 कोटी 31 लाख इतकी आहे. तसेच 2 कोटी 47 लाख किमतीच्या अत्याधुनिक मशिन आणि 15 लाखाचा कच्चा माल असे साधारण 4 कोटी 94 लाख 46 हजार 960 रुपयांचा मुद्येमाल जप्त जप्त केला आहे.
या कारखान्यात कुमार विश्वकर्मा (मध्यप्रदेश), कम्मारी राजेश्वर (तेलंगाणा), लेक राम सोनी (छत्तीसगड), महमद बशीर (तेलंगाणा,) नारायण सर्यनारायण (तेलंगणा), सिध्दार्थ कोल्हटकर(महाराष्ट्र), मनोहर खांडेकर (महाराष्ट्र), दुर्गाप्रसाद अनुसुरी (आंध्रप्रदेश), रवी पिथानी (आंध्रप्रदेश), युसुब शेख (महाराष्ट्र), कैलास कोल्हटकर(महाराष्ट), मनीकंटा लावीटी (आंध्रप्रदेश), हरिप्रसाद चाकली (तेलंगणा), सोहेल सिंग (उत्तरप्रदेश), हरिश मोर्या (उत्तरप्रदेश) या 15 जणांविरुद्ध पंधरा कर्मचारी काम करत होते.
या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक अपवाद सोडला तर ते सर्वजण परप्रांतातील रहिवासी आहेत. बनावट सिगारेट बनविणार्या कारखान्याच्या सूत्रधाराचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक सरगर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, पोलीस हवालदार झेमसे, मोरे, सावंत, म्हात्रे, मुंढे हे पोलीस पथक कारवाईत सहभागी झाले होते.