माणगाव | महाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते बाबूशेठ खानविलकर हे आज, २८ ऑक्टोबर रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणा आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबूशेठ खानविलकर शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. सुमारे पाच हजार कार्यकर्ते आल्यासोबत प्रवेश करतील, अशी माहिती खानविलकर यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिली. खानविलकर यांच्या प्रवेशानंतर ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
बाबूशेठ खानविलकर यांना मानणारा मोठा वर्ग निजामपूर विभागात आहे. राष्ट्रवादीचे महाड मतदारसंघाचे अध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी गेल्या चार वर्षांत महाड व पोलादपूर तालुकाही पिंजून काढल्याने मतदारसंघात त्यांनी आपले अनेक समर्थक कार्यकर्ते तयार केले आहेत.
गेल्या अनेक निवडणुकांमधून त्यांनी आपल्या सहकार्यांसह खा. सुनील तटकरे व स्व. माणिक जगताप यांना जास्तीतजास्त मताधिक्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गेली अनेक वर्षे ते राजकारणाच्या माध्यमातून समाजकरण करीत असल्याने त्यांनी मतदार संघातील विविध गावांतून आपली विशेष अशी ओळख निर्माण केली आहे