खारी/ रोहा | महाराष्ट्र औद्योगिक वसाहती धाटाव औद्योगिक क्षेत्रांमधील कारखान्यांचे सामाईक प्रक्रिया केंद्राद्वारे राजरोसपणे विसर्ग करण्यात आलेलया प्रदूषित पाण्याने डावा तीर कुंडलिका नदी पात्रातील जिवंतमासे मृत्यूमुखी पडून पाण्यावर तरंगू लागले आहेत. शिवाय प्रदूषित पाण्यामुळे हजारो एक्कर जमीन नापीक झाली व भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, कोळी बांधवांचा पारंपरिक मासे व्यवसाय धोक्यात येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत स्थानिक भूमिपुत्र तथा कोळी महासंघ, कोळी समाज होडी-पागी बांधव आक्रमक झाले आहेत. धाटाव औद्योगिक क्षेत्रांमधील कारखान्यांचे सामाईक प्रक्रिया केंद्राद्वारे प्रदूषित पाण्याचे विसर्ग कुंडलिका नदीच्या डावा तीर खाडीपट्ट्या मार्गे समुद्रामध्ये सोडले जाते खारगाव - आरे खुर्द येथील सेफ्टी व्हॉल्वमधून शुक्रवारी संध्याकाळी चार पाच वाजताच्या सुमारास सामाईक प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया न केलेले दूषित पाण्याचे काळेभोर निळसर हिरवेगार रंगाचे उंच उंच फवारे उडताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने कोळी महासंघ कमिटी, होडी- पागी कोळी बांधव एकवटले आणि तहसीलदारांसह संबंधित प्रशासकीय अधिकारी वर्गास संपर्क साधून सदरील घटने ठिकाणी तातडीने उपस्थित राहण्याची विनंती केली; परंतु महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ च्या आचार संहिता प्रशिक्षण आदी शासकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.
सदर महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पोर्शभूमीवर राज्यात आदर्श आचार संहिता लागू असल्याने कोळी महासंघ कमिटीने सद्यस्थितीमध्ये कोणताही आक्रमक तीव्र आंदोलनाची भूमिका न घेता आदर्श आचार संहितेचे पालन करीत निवडणुका पार पडताच दूषित पाण्याबाबत मोठे उग्र आंदोलन छेडणार असल्याचे इशारा दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सूर्यकांत वाघमारे यांनी दिला.
यावेळी दक्षिण रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सिध्दीका समीर धसाडे, रोहा तालुका अध्यक्ष सचिन चोरगे, महिला अध्यक्षा सायली सचिन चोरगे, न्हावे ग्राम पंचायत सरपंच नितीन डबीर, चणेरा विभाग अध्यक्ष दिपक न्हावकर माजी उपसरपंच तथा चणेरा विभागीय अध्यक्ष गैनीनाथ कटोरे, योगेश भोई -ग्रामीण अध्यक्ष -रोहा, मारुती वाघमारे, संदेश भोईर -सचिवजय खंडोबा मच्छी. सह. संस्था नवखार, नीलकंठ कासकर, न्हावे, बळीराम येसपाटील, खारगाव आदींसह कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.