लोकशाहीला मजबूत करा ; मतदानाचा हक्क बजवा , जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन

28 Oct 2024 19:11:12
 uran
 
उरण | लोकशाही मजबूत बनविण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मत आपला अधिकार आहे तशीच आपली जबाबदारी देखील आहे म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
 
१९० उरण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी उरण जासई येथील निवडणूक केंद्राला नुकताच भेट दिली तसेच निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ उध्दव कदम, शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
 
१९० उरण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांनी ही निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मतदान अधिकारी व निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिया व मतदान केंद्र संदर्भात प्रशिक्षण दिले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ उध्दव कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहाय्यक निवडणूकनिर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी समीर जाधव, पोलीस अधिकारी व कर्मचारी ही उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0