मराठीला मिळला अभिजात भाषेचा दजा , केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; मराठी माणसासाठी अभिमानास्पद

By Raigad Times    04-Oct-2024
Total Views |
  new delhi
 
नवी दिल्ली | महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजूरी दिली आहे. मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. याआधी तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्यालम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. आता यात मराठी भाषेचाही समावेश झाला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीज आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.
 
हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे उपमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे