माणगाव : कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू !

05 Oct 2024 18:53:16
 mangoan
 
माणगाव | माणगावपासून १२ किमी अंतरावर असणार्‍या पोटणेर गावच्या हद्दीत मुंबई- गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणार्‍या इंडीव्हर कारने पाठीमागून मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार दि.३ ऑटोबर रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडला.
 
या अपघाताची फिर्याद उमेश शंकर खैरे(वय-४०) रा.धाटाव, ता.रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत भागोजी मालू खैरे(वय-६७)रा.धाटाव,ता.रोहा हे त्यांच्या ताब्यातील हिरोहोंडा कंपनीची फॅशन प्रो मोटार सायकल एमएच ०६ बीसी १४०५ हि गाडी स्वतः मुंबई-गोवा महामार्गाने चालवीत घेऊन जात असताना माणगाव तालुयातील पोटणेर गावच्या थांब्याजवळ त्यांची गाडी आली.
 
त्यांनी उजव्या बाजूकडील इंडिकेटर देऊन रस्त्याची खात्री करून पोटणेर गावाकडे वळत असताना पाठीमागून येणारी इंडीव्हर कार क्र.एमएच ०२ ई ई ७५२० या गाडीवरील आरोपी चालकाने पाठीमागून अतिवेगात येऊन मोटार सायकलला धडक दिली. या अपघातात भागोजी मालू खैरे यांना गंभीर दुखापती होऊन त्यात त्यांचा मृत्यू होऊन मोटार सायकलचे नुकसान होऊन कारचालक पळून गेला.
 
 
Powered By Sangraha 9.0