पाली | सुधागड तालुयातील खवली गावात असलेल्या जिल्हा परिषद रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रुग्णालयात उद्धर, शिरसेवाडी, पीलोसरी, विडसई यासह अनेक गावातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. हे रुग्णालय जर नसेल तर लोकांना पाली येथे दुरचाप्रवास करून यावा लागतो.
मागील काही महिन्यापासून या रुग्णालयाचा विज बिल जिल्हा परिषदे कडून भरण्यात आला नसल्याने महावितरण कंपनीने या रुग्णालयाची वीज कनेशन कट करण्यात आले आहे. वीज पुरवठा खंडित केल्याने रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेच्या हलगर्जीपणामुळे खवली येथील रुग्णालयाची वीज खंडित झाली आहे.
याबाबतीत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. वीज पुरवठा सुरू केव्हा सुरळीत होणार याबाबतीत तालुका आरोग्य अधिकारी मढवी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही तातडीने वीज बिल भरून सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.