रोहा येथे पॅसेंजरमधून पडून तरुण जखमी

By Raigad Times    07-Oct-2024
Total Views |
 roha
 
बेणसे | रोहा रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधून पडून तरुण ट्रेन व फलाटामध्ये अडकून जखमी झाला आहे. रोहा तालुका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
रोहा रेल्वे स्थानकामध्ये दिव्यावरून सावंतवाडी कडे जाणार्‍या दिवा सावंतवाडी पॅसेंजरमधून प्रेम प्रदीप कांबळे (वय २५) रा. म्हसळा याचा पाय घसरून तो रेल्वे व फलाटाच्या मध्ये अडकला.
 
या घटनेची माहिती मिळताच टीम व धाटाव अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले व पुढील उपचाराकरिता रोहा तालुका शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.