गोखले महाविद्यालयात सायबर सुरक्षा व्याख्यान

By Raigad Times    08-Oct-2024
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात शुक्रवार दिनांक (४ ऑटोबर) रोजी महाविद्यालयाचा एन.एस.एस विभाग आणि श्रीवर्धन पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, ’सायबर सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास श्रीनिवास जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उत्तम रीकामे तसेच ‘अंशु’ या संस्थेचे निलेश गुंडो उपस्थितीत होते.
 
पोलिस उपनिरीक्षक उत्तम रिकामे यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना, ‘सध्या देशात आणि राज्यात जे ऑनलाईन फ्रॉड सर्रासपणे होत आहे. त्याची घडणारी अनेक उदाहरणे देऊन कशी काळजी घ्यावी या विषयी सजग केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांनी अध्यक्षपदावरून बोलताना, ‘प्रत्येक व्यक्तीकडे आता मोबाईल असल्याने बँकींग व्यवहार जपूनच करायला हवेत व तरुणांनी आपल्या पालकांनाही सजग करावे असे आवाहन केले.