श्रीवर्धन मतदार संघात विकास कामांची घौडदौड , विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्री आदिती तटकरे यांची

१५०० गरजु मुलामुलींना सायकलींचे वाटप ; ७ गावांतील दोन कोटींच्या खर्चाचे १० विकास कामांचे भूमिपूजन

By Raigad Times    09-Oct-2024
Total Views |
mhasla
 
म्हसळा | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या हक्काच्या श्रीवर्धन मतदार संघात खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयांचा शासन मंजुर खर्च केलेल्या विकास कामांचे उद्घाटन व भुमिपुजन कार्यक्रमांचे आयोजन करून निवडणूक पुर्व प्रचाराची घौडदौड सुरु ठेवली आहे.
 
म्हसळा तालुका विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाचे दौर्‍यात घट स्थापनेच्या पाचव्या दिवशी मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा, सकलप, तोंडसुरे, जंगमवाडी, आगरवाडा गावाच्या नवरात्रौत्सव मंडळाने स्थापन केलेल्या दुर्गा मातेचे दर्शन व महाआरतीला उपस्थिती लावली. आयोजीत कार्यक्रमाचे सुरुवातीला ना. तटकरे यांनी मतदार संघात वरदा चॅरिटेबल ट्रस्टचे माध्यमातुन गरजु शाळकरी मुलामुलींना १० हजार सायकलींचे वाटप करण्याचे जाहिर केले नुसार आज म्हसळयातील माध्यमिक शाळेतील १५०० विद्यार्थ्याना न्यू इंग्लिश स्कूलच्या क्रीडांगणात सायकलींचे वाटप करण्यात आले.
 
एकाच दिवशी म्हसळा तालुयातील ७ गावांतील शासन मंजुर दोन कोटी रुपये निधी खर्च करून बांधकाम केलेल्या लोकपयोगी विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन ना.आदिती तटकरे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. विकास कामांमध्ये प्रामुख्याने मौजे घुम येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन, घुम रूद्रवट डांबरीकरण रस्ता बांधकाम उद्घाटन, घुम-रुद्रवट ग्राम पंचायत इमारत बांधकाम भूमिपूजन, कोकबल, सांगवड गावांतील नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन, केलटे येथे सामाजिक सभागृह बांधकाम, पाणवे १० गाव सामाजिक सभागृह बांधकाम, तळवडे येथे सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
 
आयोजीत कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे यांच्या समवेत तहसीलदार खाडे, पोलिस निरीक्षक सचिन कहाळे, प्राचार्य पाटील, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती बबन मनवे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, सुनिल शेडगे, मधुकर गायकर, मिना टिंगरे, युवक अध्यक्ष फैसल गीते, अनिल बसवत, संदिप चाचले, सोनल घोले, रेश्मा काणसे, वनिता खोत, नाना सावंत, शाहिद उकये, प्रकाश गाणेकर, महेश घोले, शेखर खोत, सरपंच दिक्षा घोले, उपसरपंच श्रीकांत बीरवाडकर, सरोज म्हशीलकर, केतन आंग्रे, ग्रामसेवक योगेश पाटील, शिक्षक, पालक अंगणवाडी सेविका मदतनीस आदी मान्यवर ग्रामस्थ महीला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना दोन किलो मिटर अंतरावरील ग्रामीण भागातील गरीब गरजु मुला मुलींना शाळेत वेळेत येता यावे आणि त्यांच्या अध्यापनात वृध्दी व्हावी या हेतूने १० हजार सायकलचे वाटप करण्यात येत आहे. जनतेच्या आशीर्वादाने राज्याच्या मंत्री मंडळात एकमेव महिला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मंत्रीपदाला साजेसे काम करीत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळाचे सहकार्याने विशेष करून महिलांसाठी लाभाच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये खास करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, युवक युवतींना रोजगार निर्मिती कार्यशाळा, ग्रामसेवा दुत, तिर्थाटन योजना, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ५० टक्के वेतनवाढ, पोलिस पाटिल, कोतवाल, होमगार्ड यांचे साठी विशेष मानधन देण्यात आले आहे.
 
शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या वेळी मंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा तालुयातील अनेक गावातील प्रस्तावित विकास कामांचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र पक्षप्रतिनिधी यांच्याकडे सुपुर्द केले. आयोजीत करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे यांचे भव्य स्वागत केले.