माणगांव येथील लाडकी बहीण योजना वाचनपूर्ती सोहळ्यासाठी निघालेल्या लाडक्या बहिणींच्या बसला मांजरोणे घाटात अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने बस घाटात ४० फूट खाली गेली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र दोन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
माणगावात आज (९ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यासह, पुणे, मुंबई, ठाणे येथून लाडक्या बहिणी बसेसद्वारे दाखल झाल्या आहेत.
अशीच माणगांव तालुक्यातील रानवडे येथील लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस दु. १२. ४५ वाजण्याच्या सुमारास मांजरोणे घाटात सुमारे 40 फूट खाली गेली. प्राथमिक माहितीत ब्रेक फेल झाल्याने बस खाली गेल्याचे समजत आहे. या अपघातात महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली असून दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.