पुणे येथील महिलेची मुरुडमध्ये विहिरीत उडी घेऊन आत्महत्या ?

13 Nov 2024 17:45:14
Murud
 
मुरुड जंजिरा | मुरुड शहरातील मसाल गल्ली परिसरातील विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिला मूळची पुणे येथे राहणारी असल्याचे पुढे आले आहे. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मसाल गल्ली येथील एका विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे, तेथील साफसफाई करण्यासाठी आलेल्या महिलांच्या निदर्शनास आले.
 
त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती जागा मालकास सांगितली. मालकाने मुरुड पोलिसांना ही घटना सांगितल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. यानंतर सदर मृतदेह विहिरीतून काढून मुरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
  
या महिलेचे नाव सुमन गुप्ता (वया ५३) असून ती पुणे येथून आली असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. याबाबत अधिक तपास मुरुड पोलीस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0