कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन यांनी वादळ निर्माण केले आहे. त्यामुळे बाकड्यावर नाचणार्याला खाली खेचा आणि मशाल जिंकून आणा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. महाविकास आघाडीच्यावतीने गुरुवारी (१४ नोव्हेंबर) कर्जत येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. खोपोली शहरातील आंबेडकर स्मारक येथे आयोजित केलेल्या या सभेला मोठी गर्दी जमली होती.
शिवसेना उपनेते आमदार सचिन अहीर, उमेदवार नितीन सावंत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, कम्युनिस्ट पक्ष जिल्हा अध्यक्ष अॅड. गोपाळ शेळके, काँग्रेस जेष्ठ नेते उल्हास देशमुख, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे,तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे, शकील कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत तालुका अध्यक्ष, सेनेचे खोपोली शहराध्यक्ष मोरे आदी उपस्थित होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी मतदारांना आवाहन करताना टेबलावर चढून नाचणारा पाहिजे का? हे ठरविण्याची वेळ आली आहे, हातवारे करून नाचणारे आपले होणार नाहीत. ठेकेदार, दादागिरी, गुंडाचे राज्य, धमकावले तर जशास तसे उत्तर देऊ, मुंबई अदानीच्या खशात घातले आहे.
एक हजार एकर जमीन लाटणारे अदानी हे उद्या येथे गुजरात किंवा अदानीचे राज्य आणतील, अशी टीका केली. महायुती सरकारने लाडकी बहिण योजना राबविताना १५ लाखांऐवजी १५ हजार पाठवून फसवणूक केली आहे. मात्र आम्ही सत्तेवर आल्यावर महालक्ष्मी योजनेत तीन हजार रुपये, वर्षाला सहा गॅस फ्री, मोफत बस प्रवास, युवकांना रोजगार देऊ, असे आश्वास त्यांनी दिले. परीवर्तन पाहिजेअसेल तर महाविकास आघाडीला निवडून आणण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.