रायगड लिहिणार विकासाची गाथा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खारघर येथे प्रतिपादन

By Raigad Times    15-Nov-2024
Total Views |
 MUMBAI
 
नवी मुंबई | विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पाच्या अनुषंगाने रायगड विकासाची गाथा लिहिणार आहे. त्या अनुषंगाने पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार असून त्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) खारघर येथे केले.
 
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्षाचे उमेदवार, मंत्री रवींद्र चव्हाण (डोंबिवली), आमदार संजय केळकर (ठाणे शहर), आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), आमदार गणेश नाईक (ऐरोली), आमदार महेश बालदी (उरण), आमदार मंदा म्हात्रे (बेलापूर), आमदार रवीशेठ पाटील (पेण), आमदार महेंद्र थोरवे (कर्जत) यांच्या प्रचारार्थ झालेल्या विजय संकल्प सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
माझे सौभाग्य आहे की पुन्हा मला रायगडकरांना नमस्कार करण्याची संधी मिळाली. रायगडसोबत माझे भावात्मक आत्मिक संबंध आहेत. २०१३ मध्ये माझे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर झाले तेव्हा मी रायगड किल्ल्यावर गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बसून मी महाराजांचे आशीर्वाद घेतले. आजची गर्दी बघून २३ तारखेला निकाल काय येणार, याची गॅरंटी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात महायुती आहे, तरच गती आहे.
 
MUMBAI
 
महाराष्ट्राची प्रगती आहे असा आवाज येतो. लोकनेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करतो. त्यांचा त्याग त्यांचे परिश्रम महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यात अजून ऊर्जा देत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिवरायांनी आम्हाला स्वराज्याची शपथ दिली होती.
 
आता स्वराज्याबरोबरच सुराज्य पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासाचा संकल्प फक्त भाजप आणि महायुती सरकार करणार. काँग्रेसने फक्त गरिबाला गरीबच बनवून ठेवले आहे. गरिबी हटावचा खोट्या घोषणा देत काँग्रेसने दिवस घालवले. काँग्रेसनेगरिबांना लुटलं आहे. गरीब या संकटातून बाहेर आला नाही. स्वातंत्र्यांच्या ७० वर्षानंतरही घर कपडे आणि जेवण यासाठी तरसत होते.
 
पण पहिल्यांदा भाजप प्रणित सरकारने २५ हजार कोटी जनतेला गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही पक्की घर आणि सुरक्षा गरिबांना दिली. शौचालय बांधून देण्याच काम केले. जलजीवन मिशन अंतर्गत १२ करोड जनतेच्या घरात पाणी पोहोचवले. आज सगळ्यांकडे बँक खाते आहे. रेल्वे पटरीवर काम करणारा मजूरही आज युपीएयने पेमेंट करतो. गरीब माणूस स्वतः पुढे जातोय देशाला पुढे नेतोय.
 
या सगळ्या योजनांचा सगळ्यात मोठा लाभार्थी दलित, आदिवासी आणि मागासलेल्या व्यक्तीला झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, देशातल्या ८० करोड लोकांना मोफत रेशन पोहोचवले जात आहे. रायगडमध्ये १८ लाख लोकांना मोफत रेशन मिळत आहे. या कामाला कोणाचा विरोध असू शकतो का? काँग्रेस पार्टीला याचा आनंद होत नाही. दुःख होतेय. अशा लोकांना संधी मिळाली नाही पाहिजे. खुलेआम त्यांचा एक नेता म्हणतोय जे रोहिंग्या आहेत. त्यांना स्वस्तात गॅस देणार आहेत.
 
काँग्रेसला थांबवण्याची मोठी जबाबदारी गरिबांवर आहे. २० हजार कोटींनी नवी मुंबई एयरपोर्ट बनत आहे. ८० हजार कोटींनी वाधवान बंदर बनत आहे. ८३ हजार कोटीचे सेमी कंडक्टर प्रकल्प, आशिया खंडातील दुसरा सर्वात मोठा डेटा एआय केंद्र या ठिकाणी बनणार आहे,
 
त्यामुळे येथील युवकांना मोठी संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले. माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस महाआघाडीने प्रयत्न केले. न्यायालयात गेले पण ते या योजना बंद करण्याच्या प्रयत्नात असलेले तरी आम्ही ०३ करोड बहिणीना लखपती करणार आहोत, त्या अनुषंगाने महिलांच्या विकासासाठी योजना अंमलात आणत असून त्यांना दरवर्षी किमान १ लाख रुपये मिळतील असे नियोजन आमचे आहे.
 
असेही त्यांनी नमूद करतानाच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे अधोरेखित केले. तुम्ही फक्त आमदार नाही तर महाराष्ट्राचा विकास निवडणार आहात, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.
समाजात फूट पाडू देणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. देशाचा विकास त्यांना नेहमीच खूपत आला आहे. समाजांमध्ये फूट टाकणे आणि सत्ता काबीज करणे हेच त्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील समाजांना फोडण्याचा षडयंत्र काँग्रेसने रचले आहे.
 
परंतु, आम्ही त्यांना यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही”. काँग्रेसचे नेते परदेशांमध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्ष महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहेत.
 
जेणेकरून त्या छोट्या जातींची, समुदायांची राजकीय शक्ती कमी व्हावी आणि ठराविक लोकांनाच सत्तेचा मलिदा मिळावा. काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचं विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती राहिली आहे”.
मोदीमय वातावरण
खारघर उपनगरामध्ये गुरुवारी दुपारपासून मोदीमय वातावरण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत मोदींचे विचार ऐकण्यासाठी पनवेल, उरण आणि नवी मुंबईसह, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून भाजप महायुतीचे भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल झाले. वंदे मातरम, जय श्रीराम अशा विविध घोषणा देत हे कार्यकर्ते दाखल होत होते