शाम भोकरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

By Raigad Times    15-Nov-2024
Total Views |
 dighi
 
दिघी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा मु्ख्य प्रवक्ता शामकांत भोकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पुणे मोदी बाग येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (१४ नोव्हेंबर)पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
भोकरे यांनी आपल्या रायगड जिल्हा मुख्यय प्रवक्तापदाचा व सदस्यत्वाचा मागील दिवसातराजीनामा दिला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांना अधिकृतपणे राजीनामा पाठवत भूमिका मांडली होती. या राजीनाम्यात त्यांनी कौटुंबिक कारणास्तव पक्षाचे काम करणे शक्य नसल्याचे सांगत राजीनामा देत.
 
असल्याचे भोकरे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते स्थानिक पदाधिकार्‍यांवर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी राजीनामा देत गुरुवारी (ता. १४) राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हातात घेतली आहे.
 
स्थानिक गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे भोकरे यांनीब प्रस्तूत प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. यापुढे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगने यांचा प्रचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शाम भोकरे यांनी गेल्या काही वर्षांतआठहून अधिक वेळा पक्षांतर केले असल्याची टीका स्थानिक राष्ट्रवादीच्या (एपी) कार्यकर्त्यांनी केली आहे.