आ. महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची अलिबागमध्ये बाईक रॅली

18 Nov 2024 19:39:53
 alibag
अलिबाग | अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ रविवारी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखालील या बाईक रॅलीने संपूर्ण अलिबाग तालुका पिंजून काढला.
 
यावेळी आमदार दळवीदेखील या रॅलीत सहभागी झाले होते.सांबरी येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीत भगवे झेंडे घेवून शेकडो बाईकस्वार सहभागी झाले. सांबरीहून हेमनगर, पोयनाड, तीनविरा, पोयनाड, शहापूर ते पुढे अलिबाग करुन रेवदंडा या मार्गावरुन ही रॅली निघाली.
 
alibag
 
यावेळी ठिकठिकाणी या रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे पहायला मिळत होते. शिवसेनेची ही रॅली शहापूर येथे आली असता अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांचीदेखील रॅलीसमोर आली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
 
शिवसेनेच्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेते हर्षल पाटील, भाजप नेते अ‍ॅड. महेश मोहिते, शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी, दिपक रानवडे, उपसरपंच अभिराजदळवी, अदिती दळवी, रसिका केणी, वेेशी सरपंच गणेश गावडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0