मतदानाचा टक्का वाढीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले , ९ सखी, ८ युवा, ६ दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करणार

By Raigad Times    19-Nov-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. महिलांसाठी ९ महिला नियंत्रित सखी मतदान केंद्र, ८ युवा संचलित मतदान केंद्र, ६ दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात ९ महिला नियंत्रित मतदान केंद्र (सखी) स्थापन करण्यात येणार आहेत.
 
त्यात १८८ पनवेलमध्ये ११७ खारघर, १८९ कर्जतमध्ये २८६ खोपोली,१९० उरणमध्ये २६७ उरण, १९१ पेणमध्ये २३६ तिवरे, २६५ आंबोले, ३६४ कोलाड, १९२ अलिबागमध्ये १८२ अलिबाग, १९३ श्रीवर्धन मध्ये १६७ उतेखोल, १९४ महाडमध्ये २३० महाड असे एकूण ९ सखी मतदार केंद्र असतील. निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या केंद्रांमध्ये तैनात पोलिसही महिला असतील.
 
युवा मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात ८ युवा संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात १८८ पनवेलमध्ये ११८ खारघर, १८९ कर्जतमध्ये २९० खोपोली, १९० उरणमध्ये २५६ उरण व ९६ हाशाची वाडी, १९१ पेणमध्ये २८४ नागोठणे, १९२ अलिबागमध्ये १७८ अलिबाग, १९३ श्रीवर्धन मध्ये ९६ तळा, १९४ महाडमध्ये १८२ मोहोप्रे असे एकूण ८ युवा संचालित मतदार केंद्र असतील.
 
दिव्यांग मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात ६ दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात १८९ कर्जतमध्ये ८१ आनंदवाडी, १९० उरणमध्ये १२७ जासई, १९१ पेणमध्ये ९९ पेण नगर परिषद, १९२ अलिबागमध्ये १७९ अलिबाग, १९३ श्रीवर्धनमध्ये २५७ म्हसळा, १९४ महाडमध्ये ९५ गोरेगाव असे एकूण ६ दिव्यांग संचालित मतदार केंद्र असतील.
 
मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात ७ आदर्श संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात १८८ पनवेलमध्ये ११९ खारघर, १९० उरणमध्ये २९९ बांधपाडा/कचरे पाडा, १९१ पेणमध्ये ३४ बळवली, १९२ अलिबागमध्ये १७२ अलिबाग, १९३ श्रीवर्धनमध्ये ३१८ श्रीवर्धन, १९४ महाडमध्ये ३३८ पार्ले असे एकूण ७ आदर्शसंचालित मतदार केंद्र असतील.