नवीन पनवेल | रोख रक्कम दिली तर त्या बदल्यात दुप्पटीने रोख रक्कम देईन असे सांगून एका इसमाची ६ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन पनवेल येथे राहणार्या तक्रारदार ईसमाची दोन आरोपींपैकी एकासोबत मैत्री होती.
त्याने माझ्या मित्राला रोख रक्कम दिलीस तर तो दुप्पटीने रोख रक्कम देईल असे त्यांना सांगितले. त्याच्यावर विेशास ठेवून फिर्यादीने त्याच्याजवळ असलेली ६ लाख रुपये रक्कम त्याला दिली.
त्या बदल्यात आरोपीने ३ नोटांचे बंडल त्यांना दिले. दिलेल्याबंडल मध्ये वर खाली ५०० च्या खर्या नोटा लपवून ठेवल्या होत्या. तर आतमध्ये खेळण्यातील नोटा ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.