नवी दिल्ली | भारतीय तटरक्षक दलाने भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने पकडलेल्या ७ भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजाला रोखून मच्छिमारांची सुटका केली.
मात्र, त्यापूर्वी सुमारे दोन तास पाठलाग केला आणि त्यानंतर भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका केली. जवळपास दोन तास फिल्मी स्टाईल हा थरार सुरु होता. या सात मच्छिमारांना भारत-पाकिस्तान सागरी सीमेजवळ पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीने पकडले होते.
भारतीय मच्छीमारांना पकडून घेऊन जात असल्याचं भारतीय तटरक्षक दलाला समजताच तब्बल दोन तास पाठलाग करत भारतीय तटरक्षकाने मच्छिमारांना वाचवले. हा प्रकार घडत असताना कोणत्याही परिस्थितीत भारतीय मच्छिमारांना नेता येणार नाही, असा इशारा देत मच्छिमारांची सुटका केली.