पुतळ्याची विटंबना, गुन्हा दाखल

20 Nov 2024 19:00:40
 panvel
 
नवीन पनवेल | पनवेल तालुयातील एका गावामधील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
भातान, बौद्धवाडा येथील बुद्ध विहारातील महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना अठरा नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
 
त्यानंतर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका पोलिसांनी गणेश गाताडे आणि संजय मते (दोघेही रा. भाताण) यांना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0