मुकाबला टक्कर का होगा और जीत भी हमारी होगी , स्नेहल जगताप यांचा आ.गोगावलेंविरोधात एल्गार

धामणदिवी गावभेट दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Raigad Times    07-Nov-2024
Total Views |
poladpur
 
पोलादपूर | ‘जीत हो या हार हो| मुकाबला टक्कर का होना चाहिये| अब मुकाबला टक्कर का होगा, और जीत भी हमारी होगी|’ अशा शब्दांत १९४- महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप यांनी महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना प्रतोद व चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले आ.भरत गोगावले यांच्याविरोधात एल्गार पुकारला आहे.
 
पोलादपूर तालुयातील माटवण, सवाद, धारवली, कालवली, आंग्रेकोंड, वावे, कुळेवाडी तसेच पोलादपूर तालुयातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या धामणदिवी गावामध्ये गावभेटीचा दौरा आयोजित करण्यात आला असता महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांचा प्रचार दौरा तरुण, महिला तसेच जेष्ठ मान्यवरांच्या भरगच्च उपस्थितीत यशस्वी झाला.
 
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, संपर्कप्रमुख अजय सलागरे, काळीजचे सरपंच चैतन्य म्हामुणकर, सप्तक्रोशीतील नेते अकबरभाई वलीले, माजी सभापती तथा नगरसेवक दिलीप भागवत, संघटक कृष्णा कदम, माजी राजिप सदस्य अनिल नलावडे, साखरचे माजी सरपंच भरत चोरगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कृष्णादादा करंजे, शेकाप विधानसभा चिटणीस एकनाथ गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती वैभव चांदे, विलास सकपाळ, सागर शिंदे, तैय्यबभाई, समीर चिपळूणकर, यासिन करबेलकर, नासिर माटवणकर, मुज्जमील तांबे यांच्यासह तरुण शेकाप कार्यकर्ते व शिवसैनिक तसेच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
पोलादपूर तालुयातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या धामणदिवी गावामध्ये गावभेटीचा दौरा आयोजित करण्यात आला असता महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल माणिक जगताप यांचे धामणदिवीच्या सरपंच क्षमता राजेश बांद्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महिलावर्गाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांचा प्रचार दौर्‍यांतील सहभागामुळे ’लाडया बहिणींची लाडकी स्नेहलदिदी’ असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
 
यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शनिवारी स्नेहल जगताप यांनी लहुळसे, करंजे आदिवासीवाडी, करंजे,देवळे, दाभिळ, रानकडसरी बावळी, नाणेघोळ, केवनाळे, नाणेघोळ आदिवासी वाडी येथे गावभेटीचा दौरा केला असता महिलावर्गांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचे ठिकठिकाणी जाणवत असल्याचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.