महाराष्ट्रात तीन महिन्यांत ५० टक्के परदेशी गुंतवणूक , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

By Raigad Times    09-Nov-2024
Total Views |
 MUMBAI
 
मुंबई | गेल्या तीन महिन्यांत एकट्या महाराष्ट्रात ५० टक्क्यांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक आली असून सर्व परदेशी गुंतवणूक योजनांमध्ये महाराष्ट्राला प्राथमिकता दिली जात असल्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक वाहन योजना, ग्रीन एनर्जी आणि सोलार प्रोजेक्ट, स्टील प्रोजेक्ट असे अनेक नवे प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करण्यात आल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
 
धुळ्यात प्रचारसभेत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "भारतातील सर्वात मोठं बंदर महाराष्ट्रात तयार होत आहे. पायाभूत सुविधांच्या नवा प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. मी पायाभरणीसाठी आलो होतो तेव्हा आमच्या देवेंद्रजींनी लोकांमध्ये एक इच्छा व्यक्त केली होती. मोदीजी इतके करत आहात, हजारो कोटी लावत आहात तर तिथे एक विमानतळही तयार करा असे ते सांगत होते. त्या दिवशी तर मी शांत होतो.
 
पण आचारसंहिता संपताच, महायुतीचा शपथविधी होताच मी महाराष्ट्र सरकारसह बसून देवेंद्रजींची इच्छा पूर्ण कशी होईल यासाठी काम करेन, असा शब्द पंतप्रधान मोदी यांनी दिला. "महाराष्ट्राकडून जेव्हा काही मागितले तेव्हा राज्याच्या जनतेने खुलेपणाने आशीर्वाद दिला आहे.
 
मागच्या विधानसभेत येऊन गेलो त्यावेळी राज्याच्या जनतेने भाजपाला विजयी केले होते. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला जनतेचा आशीर्वाद पाहिजे, विश्वास देतो गेल्या अडीच वर्षात जो विकासाला गती मिळाली आहे तिला थांबू दिले जाणार नाही. येत्या ५० वर्षात राज्याला सुशासन महायुती देऊ शकते," असेही नरेंद्र मोदी म्हणाले.‘महाआघाडीच्या गाडीला ना ड्राइवर, ना पाय आहेत.
 
लोकांना लुटणारे महाआघाडीचे लोक, धोक्याने बनलेल्या सरकारचे अडीच वर्षं पहिले आहेत. आघाडी सत्तेत आल्यावर सर्व विकासकामं थाबवली. त्या सर्व योजनाथांबावल्या ज्याने राज्याचे भविष्यात उज्वल होणार होते. युतीने विकासाचे नवे आयम उभे केले, विकासाचा भरोसा मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचे आहे-अमित शहा
 
MUMBAI
सांगली | विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांची जाहीर सभा झाली. दरम्यान, शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
 
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन अमित शाह यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केले. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचे आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले.