अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड

10 Dec 2024 13:14:32
 MUMBAI
मुंबई | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा सदस्य अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची १५ व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठीच्यानावाचा प्रस्ताव सभागृहात मांडला.
 
या प्रस्तावास सदस्य सर्वश्री अनिल पाटील, अ‍ॅड. आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. यानंतर हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांच्या नावाचा विधानसभा अध्यक्ष पदासाठीचा प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केली.
 
अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयंत पाटील, नितीन राऊत हे अ‍ॅड. नार्वेकर यांना अध्यक्षपदी स्थानापन्न होण्यासाठी अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेवून गेले. सभागृहातील सर्व सदस्यांनी अ‍ॅड. नार्वेकर यांचे अभिनंदन केले.
 
 
Powered By Sangraha 9.0