नवी मुंबई | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर वैमानिकांना विमान उतरविण्यावेळी धावपट्टीचा अचूक अंदाज मिळण्यासाठी धावपट्टीवरील दिव्यांच्या मार्गाची अचूक सूचना देणार्या यंत्रणे (प्रेसिजन अॅप्रोच पाथ इंडिकेटर (पीएपीआय) सिस्टीम) ची चाचणी एका लहान विमानाच्या साह्याने गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी साडेआठ वाजता घेण्यात आली.
ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने (एनएमआयए) गुरुवारी सायंकाळी त्यांच्या समाजमाध्यमांवरील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. ही चाचणी यशस्वी झाल्याने विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर लवकरच मोठे विमान उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवरील ०८/२६ येथे चाचणी घेण्यात आली. गुरुवारी सकाळी तब्बल दोन तास धावपट्टीवर लहान विमान चाचणीसाठी घिरट्या घालत होते. विमान उतरविण्यासाठी वैमानिकांना धावपट्टीवरील मार्गाचा अचूक संदेश सूचकता दर्शविणार्या दिव्यांचा आधार घ्यावा लागतो.
धावपट्टीवरील दिवे मार्गातील अचूक सूचनेमुळे वैमानिकांना धावपट्टीवरील दृष्यमानता कमी असताना याच दिव्यांच्या आधारे विमान उतरवावे लागते. त्यामुळे या चाचणीला विशेष महत्त्व आहे. गुरुवारी ही चाचणी पूर्ण झाल्याने पुढील चार महिन्यात नवी मुंबई विमानतळावरुन विमानाचे उड्डाण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ११ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले लढाऊ विमान सी- २९५ हे उतरविण्यात आले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन धावपट्टी आहेत. त्यातील दक्षिण धावपट्टी पहिल्या टप्यात सुरू होणार आहे. या धावपट्टीची ३७०० मीटर लांबीची आणि ६० मीटर रुंदीची आहे.
पहिल्या टप्यात मालवाहू विमानतळ या विमानतळावरुन सुरू होणार आहे. चाचणीचे महत्त्व विमान उतरविण्यासाठी वैमानिकांना धावपट्टीवरील मार्गाचा अचूक संदेश सूचकता दर्शविणार्या विज दिव्यांचा आधार घ्यावा लागतो. धावपट्टीवरील दिवे मार्गातील अचूक सूचनेमुळे वैमानिकांना धावपट्टीवरील दृष्यमानता कमी असताना याच दिव्यांच्या आधारे विमान उतरवावे लागते. त्यामुळे या चाचणीला विशेष महत्त्व आहे.
पीएपीआय सिस्टीम म्हणजे काय?
प्रेसिजन अॅप्रोच पाथ इंडिकेटर (पीएपीआय) सिस्टीम वैमानिकांना स्ट्रॅटेजिक लाईट पोझिशनिंगद्वारे योग्य लँडिंग ट्रॅजेक्टोरीज राखण्यास मदत करते.
लँडिंगदरम्यान रिअल- टाईम व्हिज्युअल उंची मूल्यांकन प्रदान करते. उभ्या स्थिती दर्शविण्यासाठी रंग भिन्नतेचा वापर करते. वैमानिकांना त्वरित मार्गक्रमण दुरुस्त करण्यास सक्षम करते आणि अचूक दृष्टिकोन मार्गदर्शनाद्वारे एकूण विमान वाहतूक सुरक्षितता वाढवते.