महाड । परभणी येथील संविधानाचे शिल्प विद्रुप करणार्या समाजकंटकाचा निषेध करण्यासाठी काढलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात या आंदोलनात सहभागी नसलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याचा निषेध करून या मृत्यूस जबाबदार असणार्या पोलिसांवर कारवाई करावी असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) महाड तालुका यांनी महाड तहसिलदार यांना दिले आहे.
याप्रसंगी आरपीआयचे महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे, कोकण प्रदेश संघटक केशव हाटे, महाड तालुका सचिव लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष अशोक मोहीते, संतोष हाटे,महाड शहर अध्यक्ष प्रभाकर खांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. परभणी येथील संविधानाचे शिल्प विद्रुप करणार्या समाजकंठकाविरोधात निषेध करण्याकरिता संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये भिमसैनिकांनी भिमसैनिकांनी मोठे आंदोलन केले होते.
या निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकरांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या आंदोलनात नसताना कायद्याचा विद्यार्थी असणार्या भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याची पोलिस कोठडीत झालेल्या मृत्युची सखोल चौकशी करावी. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेचया प्रकरणी मारहाण करणारे जे पोलिस जबाबदार असतील त्यांना तात्काळ नोकरीतून बरखास्त करावे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी अशा प्रकारची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) महाड तालुका यांनी तहसिलदार महेश शितोळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.