गारंबी धरणाचा विकास झाल्यास पर्यटन वाढेल , गारंबी धरणाचा विकास झाल्यास पर्यटन वाढेल

17 Dec 2024 17:15:31
 Murud
 
मुरुड जंजिरा | मुरुड शहराला व नांदगाव पंचकृषी व शेतीसाठी लागणारे पाणी नवीन झालेल्या खरआंबोली धरणातून मुबलक प्रमाणात सुरु आहे. पूर्वी हे गारंबी धरणातून होत असे, म्हणून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असे. खारआंबोली धरण झाल्यावर पाणीटंचाई संपली आज पावसाळी गारंबी धरणातील पाणी ओव्हर फ्लो होऊन समुद्रात जाते. त्याच फुकट जाणार्‍या पाण्याचा वापर पर्यटनासाठी केला तर परिसरातील गावांचा आर्थिक विकास साधता येईल, अशी आशा आहे.
 
गारंबी परिसर नैसर्गिक इतका सुंदर आहे, गर्द झाडीने व्यापलेला असल्याने परिसरात दिवसादेखील अंधार असतो काळ्या दगडावरून आवाज करत वाहणारे पाणी विविध पक्ष्यांचा येणार कोमल आवाज, व औषधी वनस्पतींची हजरो झाडे अशा परिसरात नियोजबद्ध पर्यटन विकास केल्यास मुरुडकडे येणार्‍या पार्टकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. विकासात वनखात्याने मदत केले तर जलक्रीडेसोबत अभयारण्यचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे गारंबी धारणाला इतिहास आहे.
 
जंजिरा संस्थानाचा पुरोगामी विकास करणारे सर सिद्दी अहमदखान यांनी विटोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या जंगलातील धरणास विटोरिया ज्युबीली वॉटर वर्स हे नाव दिले. विपुल वनसंपत्ती नैसर्गिक पाणी अडवून बांधलेले हे धरण गारंबी धरण म्हणून प्रसिद्ध आहे. शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरुन नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा वापर करुन केले जात होता. सध्या मे अखेरीस आंबोली धरणाचे पाणी कमी पडल्यास गारंबीचा पाणी वापरण्यात येते.
 
पर्यटक पाण्याच्या प्रवाहांत डुंबण्यासाठी हमखास या ठिकाणी जातात. वनभोजनासाठी हे ठिकाण आदर्श आहे. पाण्याचा मुळ प्रवाह दुषित न करण्याचे सामंजस्य बाळगुन निसर्गाचा आनंद घेण्यास कोणतीच हरकत नाही. दरीत उतरणारी जांभ्या दगडातील पायवाट, चहुबाजूस प्रचंड वृक्षराजी मोठ मोठे खडक, वाहत्या पाण्याची गाज, पक्ष्यांची किलबिल यामुळे पर्यटक गारंबी परिसरात खिळून जातो. मुरुड गारंबी मार्गे रोहा रस्ता झाल्याने पुणे कोल्हापूर परिसरातील पर्यटक ह्या जंगल मार्गे आनंदाने प्रवास करतात.
 
हामार्ग वळणदार आहे. पावसाळ्यात सर्व परिसर हिरवाईने नटलेला असतो. हल्ली पर्यटकांना भिजण्याचा व पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ठिकाण पाहिजे असते. जर गारंबी धरणाचा विकास झाला. तर मुरुड शहरातील बेरोजगारांना काम मिळेल. गारंबी मुख्य धारणखाली सद्य ३ छोटे बंधारे आहे.
 
तसेच अजून २ मोठे बंधारे बांधले व त्यांना पायर्‍या बांधून बंधार्‍यापर्यंत जाणारा रास्ता केला व पर्यटकांच्या पार्कींगची सोया केली तर मुरुडला येणार पर्यटक उधाणलेल्या समुद्रात जायला घाबरतो त्यावेळी गारंबीचा संथ पाण्यात भिजण्याचा सुरक्षित आनंद घेणे पसंत करेल. सध्या नागशेत गावात, शिंगरे गावात, तळवडे गावातून धरणाचे पाणी समुद्राला मिळते या ठिकाणी पर्यटन बंधारे होणे गरजेचे आहे.
गारंबी धरणाचा पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने मूळ धरणाला हात लावणे तांत्रिक दृष्ट्या शय नसल्याने धरणातून फुकट जाणारे पाणी धरणाखाली नागशेत गावाजवळची दरीतून वाहत येते २ डोंगर जर उंच बंधारा बांधून भुशी डॅमप्रमाणे पायर्‍या केल्या तर पर्यटन व्यसायाला चालना मिळेल गारंबी मुरुड रस्त्याला लागत असल्याने पर्यटकांना जाणे सोपे होईल. - प्रमोद भायदे, माजी पाणी पुरवठा सभापती, मुरुड
Powered By Sangraha 9.0