कर्जत | कर्जत तालुयाचे शेवटचे टोक असलेल्या पाषणे येथील तरुण आपल्या दुचाकीचे डिक्कीमधून विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या तरुणाला तपासणी मोहिमेत नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ३७ हजार ३५० रुपयांचे विदेशी मद्य हस्तगत करीत वाहतूक करणार्या तरुणाला अटक केली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत १५ डिसेंबर रोजी १७:२५ वाजण्याच्या सुमारास कर्जत बदलापूर रोड येथे नेरळ पोलीस ठाण्यासमोर वाहतूक पोलीस गाड्यांची तपासणी करीत होते. पोलिसांनी तपासणी करताना स्कूटी थांबवली असता त्या स्कुटी गाडीचे डिकीमधून विदेशी मद्यांची वाहतूक करीत होता. पोलिसांच्या तपासणी मोहिमेत पाषाने गावातील २७ वर्षीय तरुणाची टीव्हीएस स्फुटी गाडी तपासली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
त्या गाडीमधून रॉयल स्टेग, मॅकडोनाल्ड आणि डीएसपी या विदेशी मद्य यांच्या १८० मिलीच्या प्रत्येकी १५ बॉटल यांची वाहतूक विनापरवाना करीत होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला असून नेरळ पोलिसांनी याप्रकरणी त्या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची ३० हजार रुपये किमतीची स्कुटीदेखील ताब्यात घेतली आहे.
वाहतूक पोलीस नितीन अहिरे यांनी त्याबाबत फिर्याद नेरळ पोलीस ठाणे येथे नोंदवली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रविण लोखंडे हे करीत आहेत.