गड-किल्ल्यांवर मद्यपान, केल्यास होणार कारावास

18 Dec 2024 16:12:07
 raigad
 
नागपूर | महाराष्ट्रातील गडकिल्ले, प्राचीन वारसास्थळी मद्यपान करून धिंगाणा घालणारे आणि वास्तूंचे नुकसान करणार्‍यांना १ लाखांचा दंड आणि दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद करणारे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके आणि पुराण वस्तुशाखविषयक स्थळे आणि अवशेष सुधारणा हे विधेयक विधिमंडळात सादर करण्यात आले.
 
त्यात गड किल्लयांचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. हे सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर विधेयकाविषयी माहिती देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सादर केले. गडकिल्ल्यांवर जाऊन मद्यमान करण्याचे प्रकार वारंवार समोर येतात.
 
इतिहासाची विटंबना करणार्‍या अशा महाभागांना शिवप्रेमींकडून समज दिली जाते; पण यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात असावी, अशी मागणी शिवप्रेमींकडून वारंवार केली जात होती. यासंदर्भात अधिवेशनात निर्णय घेण्यात आला. आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गडकिल्ल्याचे पावित्र्य भंग करणार्‍यांमध्ये धाक निर्माण होईल, अस विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, याआधी असा गुन्हा करणार्‍यांना १ वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा करण्याची तरतूद होती. यात आता बदल करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0