अलिबाग । रायगड जिल्ह्यातील 19 खाजगी फळरोपवाटिकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. निकृष्ट दर्जामुळे कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशा परवाना रद्द केलेल्या, निकृष्ट दर्जा असलेल्या खाजगी फळरोपवाटिकांकडून कोणत्याही प्रकारची कलमे, रोपे यांची खरेदी करु नये, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
2024 ते 2025 या आर्थिक 2023 ते 2024 आणि वर्षात विभाग स्तरावरुन जिल्हानिहाय परवानाधारक खाजगी फळरोपवाटिकांची आंतरजिल्हा तपासणी समितीकडून तपासणी करण्यात आली होती. या समितीच्या अहवालामध्ये “सर्वसाधारण अभिप्राय-ड निकृष्ट दर्जा” असलेल्या फळरोपवाटिकांचे परवाने रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
2023-24 मध्ये तपासणी समितीने रद्द केलेल्या फळरोपवाटिकांमध्ये स्नेहल नर्सरी नवेघर-अलिबाग, स्वप्नील नर्सरी आगारकोट-अलिबाग, एस पी नर्सरी चौल ता.अलिबाग, आशा रोपवाटिका बंडवाडी ता.म्हसळा, कौस्तुभ नर्सरी, आसुफ पो.दांडगुरी ता.श्रीवर्धन, लौकिक नर्सरी, दिवेआगार ता. श्रीवर्धन, माही नर्सरी ता.श्रीवर्धन, मानसी रोपवाटिका दिवेआगार ता. श्रीवर्धन, पुष्पक रोपवाटिका श्रीवर्धन, ओम रोपवाटिका दिवेआगार ता.श्रीवर्धन या रोपवाटिकांचा समावेश आहे.
तर 2024-25 या आर्थिक वर्षात तपासणी समितीने रद्द केलेल्या फळरोपवाटीकांमध्ये राज रोपवाटिका, कोकरेतर्फे नाते, ता.महाड, ओम रोपवाटिका, कोकरेतर्फे नाते ता.महाड, लौकिक रोपवाटिका दिवेआगार ता. श्रीवर्धन, कौस्तुभ रोपवाटिका आसुफ ता. श्रीवर्धन, मानसी रोपवाटिका, दिवेआगार ता. श्रीवर्धन, ओम रोपवाटिका दिवेआगार ता. श्रीवर्धन, सात्विक रोपवाटिका नागळोली ता. श्रीवर्धन, रामेश्वर फार्म आणि नर्सरी चंदरगाव, ता. सुधागड- पाली, जिज्ञा नर्सरी पालांबे ता. अलिबाग या 9 फळरोपवाटिकांचा समावेश आहे. तरी अशा परवाना रद्द केलेल्या, निकृष्ट दर्जा असलेल्या खाजगी फळरोपवाटिकांकडून कोणत्याही प्रकारची कलमे रोपे यांची उचल, विक्री करण्यात येऊ नये, असे आवाहन रायगडचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.