वाढीव घरपट्टीविरोधात तळा शहरातील नागरिक आक्रमक , 3 ते 24 डिसेंबर रोजी सामुहिक हरकतीत होणार सहभागी

By Raigad Times    02-Dec-2024
Total Views |
 tala
 
तळा । तळा नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर वाढीच्या नोटीसा बजावल्या असुन जाचक वाढीव कर विरोधात सर्व पक्षीय नागरिक आक्रमक झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कर परवडणारे नसुन रहीवासी सामुहिक हरकती नोंदवीण्यासाठी नगरपंचायत समोरआक्रमक पवित्रा घेणार आहेत. तालुका डोंगराळ दुर्गम असून शहरात नगरपंचायतीने मुलभूत सोयी सुविधा दिल्या नाहीत. पाणी एकदिवस आड येत आहे.
 
ते ही वेळेवर नाही. वीजपुरवठा खंडित झाला कि बोंबाबोंब, कधी बिघाड झाला कि पुरवठा बंद, काही ठिकाणी रस्ता देखील झाला नाही. रस्ते गटारे हा काय विकास झाला का. शासकिय कर्मचारी समस्या मुळे इंदापूर माणगांव रोहा येथे रहायला जात आहेत त्यामुळे स्थानिकांना भाड्यांमधून उत्पन्न मिळत नाही. उद्योग निर्मीतीनाही रोजगार नाही त्यामुळे स्थलांतरित होत आहेत. आधुनिक काळात सुस्थितीत घर बांधून नोकरी निमित्ताने शहरात गेली आहेत.अनेक घरेअनधिकृत बांधकाम दाखवली जात आहेत.
 
नगरपंचायत नियमा नुसारटाऊन प्लॅनिंग तयार नाही. मालमत्तामोजणीसाठी कंत्राटी पद्धतीने कामगार घेऊन मोजमापे घेतली याबाबत चौकशी केली असता कामगार म्हणतात की आम्हाला जे सांगितले तेव्हढेच करतोय या बाबतीत पुर्ण माहिती नाही. अनधिकृत बांधकाम ची घरपट्टी वसुली करीत नाही वाढीव बांधकाम किंवा नुतनीकरण बांधकाम केलेला कर घेत नाही त्यामुळे उत्पन्न कर दिसत नाही.
 
वाढीव बांधकामाचे टाऊन प्लॅनिंग नुसार होणारा कर एकत्रीत करातून भरलेला वजा करून करदात्यांना कर भरणे सोपे गेले असते. उत्पन्नात वाढ दिसली असती पण नगरपंचायत प्रशासन याबाबत गांभीर्याने विचार न करता वाढीव कर लादून कराच्या ओझ्याखाली दाबत असल्याचा प्रकार चालवीत आहे या अन्यायाविरुद्ध नागरीक संतप्त झाले आहेत. या तळा विकास आघाडी ने देखील उडी घेतली असून न्यायालयात जावून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून जाचक व मनमानी कारभारा विरूद्ध दाद मागून न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावली आहे.आपली हरकती विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.