उल्हास नदीवरील शिरसे पूलाचे काम अंतिम टप्प्यात

20 Dec 2024 19:14:40
 KARJT
 
कर्जत । तालुक्यातील वासरे परिसरातून वाहणार्‍या उल्हास नदीवर शिरसे आणि आवळस ही गावे जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. 2023 मध्ये उल्हास नदीवर शिरसे गावाच्या बाहेर पुलाचे बांधकाम सुरु झाले असून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलामुळे पळसदरी रेल्वे स्टेशनकडे जाणे अधिक सोपे आणि जवळचे ठरणार आहे.
 
तालुक्यातील कातळदरा येथे उल्हास नदी उगम पावते आणि त्यानंतर कर्जत तालुक्यातून वाहते. त्यानंतर आडिवली येथून कर्जत शहर अशी पुढे चांदई येथून आंबिवली अशी नेवाळी कोल्हारे दहिवली मालेगाव शेलू आणि पुढे पाषाणे अशी ठाणे जिल्ह्यात जाते. उल्हास नदी हि ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाते. या नदीवर शिरसे गावाजवळ पूल बांधान्यता यावे. अनेक वर्षांपासून ची मागणी होती.
 
शिरसे गावाच्या पलीकडे आवळस, नेवाळी, अशी गावे असून तेथून जाणारा रस्ता हा पुढे कर्जत खोपोली रेल्वे मार्गवरील पळसदरी येथे जातो. त्यामुळे शिरसे येथे पूल झाल्यास आकूरले पासूनचे तरुण यांना नोकरी साठी तसेच शाळेसाठी जाणारे विद्यार्थी यांना देखील कर्जत स्थानकात जाऊन उपनगरीय लोकल पकड़ण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुले शिरसे येथे किंवा तमनाथ येथे पूल व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती.
 
कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिरसे येथे पूल बांधण्यासाठी निधी मंजूर केला. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाचे काम सुरु केले असून आता या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलाच्या पूर्णत्वामुळे पळसदरी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार होणार आहे. त्याचा फायदा खोपोली खालापूर येथील औधगिक वसाहतीमध्ये जाणारा नोकरदार वर्ग तसेच शिक्षणासाठी खोपोली येथे जाणारे विद्यार्थी यांच्यासाठी शिरसे येथील पूल मदतगार ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0