खोपोली | मुंबई- पुणे जुन्या महामार्गांवर चौक आसरेवाडी जवळ एका रिक्षाला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षा समोर चालणार्या जैन साध्वीच्या टीमवर जोरदार धडकली.
यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आटो रिक्षा चालक महेंद्र शंकर कदम (वय ४१ रा कांदिवली मुंबई) हा मुंबईकडे जात होता. तो आसरेवाडीजवळ आला असता तिला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रिक्षाने रस्त्याच्या बाजूने चालणार्या जैन साध्वीना जोरदार धडक दिली. जैन साध्वीसोबत चालणारे (मित विनोद जैन वय १८ रा.शिळफाटा, खोपोली) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.