रत्नागिरी | महायुती सरकारमध्ये खातेवाटप करण्यात आले. यानंतर आता महायुती सरकारमध्ये पालक मंत्रीपदावरू न रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत असतानाच, रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी इच्छा योगश कदम यांनी व्यक्त केली आहे.
यानंतर मी पालकमंत्री झालो तरी योगेश कदम पालकमंत्री झाल्यासारखेच आहे, असे उदय सामंत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, आम्ही कुटुंबासारखे काम करतो, आमच्यात समन्वय आहे. ‘उदय सामंत जेष्ठ आहेत. मी त्यांच्याकडे मोठा भाऊ म्हणून पाहतो. उद्योगमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याला न्याय दिला आहे.
त्यामुळे उदय सामंत यांना पालकमंत्री पद मिळावे अशी इच्छा आहे’, असे योगेश कदम यांनी म्हटले. मी पालकमंत्री झालो तरी योगेश कदम पालकमंत्री झाल्यासारखेच आहे. त्यांना कोणते पद मिळाले मला आनंद आहे. आमच्यात समन्वय आहेत.’, अशी प्रतिक्रिया यानंतर उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.