अलिबाग | तालुयातील मानकूळे धेरंड पूल शासनाने कार्यान्वित करावा तसेच खारेपाटातील जनतेचे स्वप्न साकार व्हावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अलिबाग तालुका ओबीसी सेल अध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केले पुढे म्हणाले की गेले अनेक वर्ष सदरचा पूल बांधून तयार आहे. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूने रस्त्याचे मार्ग होणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे सदरचा मार्ग सुरू झाल्यास बहिरीचा पाडा मानकूळे नारंगीचा टेप बंगला बंदर तसेच हाशिवरे रेवस व संपूर्ण खारेपाटातील प्रवासी वर्गाला पोयनाड बाजारपेठ कमी वेळेत व कमी खर्चात येणे जाणे होईल तसेच पेण पनवेल वडखळ नवी मुंबई ठाणे अशा विविध ठिकाणी प्रवासी वर्ग उद्योग व्यवसायिक विद्यार्थी जेष्ठ नागरिक इतर प्रवासी वर्गाला सोईस्कर पडेल विशेष म्हणजे एसटी बसेस ची संख्या वाढल्यास सदर पुलामुळे मानकूळे बहिरीचा पाडा नारंगीचा टेप बंगला बंदर धेरंड शहापूर मोठे शहापूर पेझारी पोयनाड या गावातील शेकडोंच्या संख्येने प्रवासी वर्ग एसटीला जोडला जाईल त्या माध्यमातून एसटीचे महसुली उत्पादन वाढेल.
तसेच सदर पूल झाल्यास व दोन्ही बाजू चांगल्या प्रकारे रस्ते निर्माण झाल्यास या परिसरात चांगले उद्योग व्यवसाय निर्माण होण्यास मदत होईल त्या अनुषंगाने संपूर्ण खारेपाटातील तरुणांना रोजी रोटीच्या संधी प्राप्त होती. त्या अनुषंगाने सदर पूल कार्यान्वित होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे तसेच रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले तसेच अलिबाग मुरुड मतदार संघातील कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी तसेच कोकणचे भाग्यविधाते व रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी दखल घ्यावी अशी खारेपाटातील जनतेकडून मागणी होत आहे. तसेच या संदर्भात लवकरच निवेदन शासनाकडे सुपूर्द करण्यात येईल असे मत वैभव पाटील व सामाजिक कार्यकर्ते सुनिल म्हात्रे यांनी व्यक्त केला.