वृद्ध महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ निजामपूरमध्ये महिलांचा मोर्चा

24 Dec 2024 17:01:06
 mangoan
 
माणगांव | माणगांव तालुयातील निजामपूर शहरात ८० वर्षीय वृद्ध महिलेवर सुमारे १८ वर्षाच्या तरुणाने अत्याचार केला. याप्रकरणी (२० डिसेंबर) माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यानंतर माणगांव तालुयात या घटनेच्या विरोधात निषेधार्थ पडसाद उमटत आहेत. असाच निषेध मोर्चा निजामपूर शहरात दि. २२ डिसेंबर रोजी काढण्यात आला. या मोर्चामध्ये निजामपूर मधील महिला भगिनी व त्यांच्या साथीला विविध सामाजिक संघटना आणि समस्त निजामपूर ग्रामस्थ उपस्थित होते.
 
या मोर्चात आरोपिला फाशी द्या कडक कारवाई करा अशा मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच ’आजीला न्याय द्या’ आरोपीला कठोर शिक्षा करा असा घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा पीडित महिला यांच्या घरापासून थेट आय टी आय निजामपूर ते निजामपूर बाजारपेठ -सोमजाई मंदिर निजामपूर श्रीराम मंदिर निजामपूर असा काढण्यात आला.
 
यामध्ये निजामपूर शहरातील बहुसंख्य महिला वर्ग व विविध समाजाची पुरुष मंडळी देखील उपस्थित होती. यावेळी निजामपूर येथील प्रकरणी प्रशासनाने संबंधित आरोपी विरोधात योग्य ती दखल न घेतल्यास ह्या आंदोलनाचे उग्र स्वरूप माणगाव तालुयातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिसून येईल असे मत या मोर्चा आंदोलनात सहभागी झालेल्या निजामपूरवासीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0