नागोठणे | नागोठणेजवळील कोलेटी गावाजवळ दुचाकीस्वार घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्यामागे बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे. अंश परशुराम कोष्टी (वय १९) रा. महात्मा गांधी नगर, कोपरी ठाणे व मागे बसलेला भरत शंकर जोशी (वय २३) रा. महात्मा गांधी नगर, कोपरी ठाणे हे दोघे सोमवारी रायगडकडून ठाण्याकडे जात होते.
दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास याची दुचाकी कोलेटी गावाजवळ आली असताना, चालक अंश याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातातअंश कोष्टी याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेला भरत जोशी याला पनवेल येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी देण्यात आले.