पनवेल | खारघर येथील सेक्टर ३ मध्ये अज्ञात तरुणाने हाय-टेंशन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून एक तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा केला. सदर तरुण दारूच्या नशेत होता.
पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीसांच्या जवळपास एक तासांच्या प्रयत्नानंतर हा तरुण खाली आला. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. खारघर येथील बेलपाडा आदिवासीवाडीच्या हाय टेंशन टॉवर आहे.