शाळेच्या बसमधून गोमांसाची वाहतूक , म्हसळा येथील धक्कादायक घटना; डॉक्टरसह दोनजण अटकेत

By Raigad Times    25-Dec-2024
Total Views |
 mhasla
 
म्हसळा | बेकायदा गो हत्या, गोमांस वाहतुकीच प्रकार वाढीस लागले आहेत. जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे याबाबतची कारवाई पोलीस करीत असतात. मात्र परवा म्हसळा येथे गोमासांची स्कुल बसमधून वाहतूक होत असल्याची धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. म्हसळा पोलीसांनी याप्रकरणी एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे.
 
म्हसळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्बा येथे राहणारा डॉ. हुसेन याने गोवंशांची कत्तल केली आणि तो मांस निशाल अब्दुल गफुर पेणकर राहणार म्हसळा नवा नगर यांने त्याची स्कूल बसमधुन वाहतूक केली. याबाबत गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन कहाळे, पोलिस उप निरीक्षक रोहिनकर, पोलिस उप निरीक्षक धुमास्कर, पोलीस हवालदार बांगर, पोलीस शिपाई मुल्ला, हंबिर, राठोड यांनी सदर व्हॅनचा पाठलाग केला.
 
ही व्हॅन पोलिसांनी म्हसळा ढोर्जे फाटा येथे पकडून पाहणी केली असता, स्कूल बसमध्ये २५० किलो गोमांस आढळून आले. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून स्कूल व्हॅनसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसळा तालुक्यात गो-वंशाची चोरी करणे, गो-हत्या करून मांस विक्री करणे याबाबतच्या घटना सातत्याने घडत आहेत. म्हसळा पोलिसांकडून कारवाईदेखील केली जात आहे. मात्र तरीही या गो हत्या थांबताना दिसत नाहीत.