कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा आजनागरी सत्कार!

27 Dec 2024 18:08:40
 mhad
 
महाड | महाड विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा ऐतिहासिक विजय प्राप्त करून मंत्रीपदी विराजमान झालेल्या रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांचा महाड विधानसभा मतदार संघाच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
 
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित असणार असल्याची माहिती युवा सेनेचे नेते विकास गोगावले यांनीदिली. शिवसेना राज्य युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चांदे क्रीडांगण महाड येथे आयोजित करण्यात आला आहे.
 
या सत्कार सोहोळ्याला रायगडचे माजी पालकमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित राहणार असून या सत्कार सोहोळ्याला महाड मतदार संघातील किमान १५ हजार शिवसैनिकांची उपस्थिती असेल असे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रवक्ता नितिन पावले यांनी सांगितले. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच महाडमध्ये आगमन झालेल्या नाम भरत गोगावले यांचे हजारो समर्थकानी जल्लोषात स्वागत केले होते. आज त्याच उत्साहात त्यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0