बोगस नंबरप्लेट्सना बसणार ब्रेक , सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक

28 Dec 2024 12:20:26
 alibag
 
अलिबाग | वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणार्‍या वाहनांची ओळख पटविणे यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिल असून या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या १ एप्रिल २०१९ पूर्वी उप्तादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यास अवगत केले आहे.
 
राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांची ३ झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्राची झोन-१ मध्ये विभागणी करण्यात आलेली असून या उत्पादकास, संस्थेस वितरक म्हणून प्राधिकृत केले आहे. सदरील हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बँकीग करण्यासंबंधी या लिंकवरुन नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 
त्यासाठी वाहन मालकाचे वाहन ज्या कार्यालयात नोंदणी झालेली आहे त्या कार्यालयात जावून तसेच वाहन ४.० या संगणक प्रणालीवर ऑनलाईन मोबाईल क्रमांक अद्यावयत करण्यात यावा, त्याशिवाय हाय सेक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी होणार नाही. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट नंबरप्लेट संचासह बसविण्याचे शुल्क वगळून खालीलप्रमाणे आहेत. तसेच एकदा फि भरल्यानंतर त्याची मुदत ९० दिवस असेल त्यानंतर परत फि भरावी लागेल.
 
 
Powered By Sangraha 9.0