सा.बां.च्या कनिष्ठ अभियंत्यांची चुकीची जेष्ठता सूची मॅटकडून रद्द , पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या अभियंत्यांना दिलासा

30 Dec 2024 16:55:25
 Murud
 
कोर्लई | चुकीची ज्येष्ठता यादी तयार करुन, कनिष्ठ अभियंत्यांना सेवा ज्येष्ठ करणाऱ्यांना ‌‘मॅट‌’ने जोरदार चपराक दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची ही चुकीची ज्येष्ठता सूची मॅटकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या अभियंत्यांना दिलासा मिळाला आहे.
 
सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जेष्ठता सूची ही कर्मचारी ज्या तारखेला शासन सेवेत रुजू होतो त्या दिनांकापासूनच दिली जाते, हा नियम आहे. या नियमानुसारच जुलै 2022 पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची ज्येष्ठता सूची तयार करुन, प्रसिद्ध करण्यात आली होती.
 
परंतु, फेब्रुवारी 2023 ला अचानक या जेष्ठता सूचीमध्ये गडबड करून रुजू दिनांकानुसार जेष्ठता सूची तयार न करता मजतील काही ठराविक अभियंत्यांना सहा महीने ते साडेतीन वर्षांपूवचा सेवेत नसतानाचा व कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची मान्यता नसलेला मानीव दिनांक देऊन सेवा कनिष्ठ असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांना सेवा जेष्ठ करण्यात आले. या चुकीच्या जेष्ठता सूचीला काही अन्याय झालेल्या अभियंत्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये आव्हान दिले आहे.
 
यापैकीच एका प्रकरणात मॅटमध्ये सुनावणी होऊन ही चुकीची जेष्ठता सूची रद्द करण्यात आली आहे. आठ आठवड्यात नियमांनुसार ज्येष्ठता सूची तयार करण्याचे आदेश मॅटने 11 नोव्हेंबर 2024 रोजीच्या निर्णयाने दिलेले आहेत. या निर्णयामुळे ज्येष्ठता सूचीसारख्या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये गडबड करणाऱ्यांना मॅटने जोरदार चपराक दिली आहे.
 
आता नियमांनुसार व रुजु दिनांकानुसारच ज्येष्ठता सूची तयार करून कनिष्ठ अभियंत्यांना न्याय मिळावा व चुकीची ज्येष्ठता सूची तयार करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
---------------------------------------------------
माझे नाव पद्दोन्नतीकरीता 2022 या वषच होते. परंतु या चुकीच्या ज्येष्ठता सूचीमुळे 2022 ते 2024 असे दोन वर्षे मला पदोन्नतीपासून डावलले गेले होते. आता ‌‘मॅट‌’च्या निर्णयामुळे माझ्यासारख्या अन्याय झालेल्या शेकडो शाखा अभियंत्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - यु.एस. राठोड, शाखा अभियंता, सा.बां.उपविभाग मुरुड-जंजिरा, जि.रायगड
Powered By Sangraha 9.0