म्हसळा | म्हसळा शहरासह संपूर्ण तालुयात माकडांनी उच्छाद मांडला असून तालुयातील बागायतदार त्रस्त झाले आहे. हा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. आंबा, काजूचा हंगाम जवळ येत असून काही भागात काजू, आंबा पिकांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र हा कोवळा मोहोर माकडांकडून उद्ध्वस्त होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. तालुयाच्या काही भागात सुपारी पिकांच्या बागा सध्या फुलण्याच्या तयारीत असून त्याही पूर्णपणे फुलण्याच्या आताच माकडांकडून नासधूस केली जात असल्याने, बागायतदारांच्या चिंतेत आहेत.
वन विभागाकडून यावर काहीतरी ठोस उपाययोजना व्हावी, अशी मागणी बागायतदारांकडून जोर धरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुयात फळबागा आणि शेतीपिकांचे माकडांकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी, बागायतदार हवालदिल झाला आहे.
शेतकरी आणि बागायतदार आर्थिक संकटात असून कर्जबाजारी झाला आहे. शेतकर्यांनी अनेक वेळा वन विभाग आणि शासनाचे लक्ष वेधले असून वन खात्याने माकडांच्या उपद्रव थांबावा, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली. अवैध जंगल तोडीमुळे जंगले ओसाड झाली असून, माकडांचे खाणे नष्ट होत आहे.
त्यामुळे या माकडांनी आपला मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळवला आहे. अलीकडे तर माकडे घरांच्या छपरावरून घोळयाने उड्या मारून कौलांचीही नासधूसकरीत आहेत. खाण्यासाठी घराच्या खिडकीतून घरात शिरून खाण्याच्या वस्तूंची नासधूस करण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा प्रकारामुळे घरातील माणसे खूप भयभीत झाली आहेत.
उपद्रव सुरु असून सुपारीच्या बागांमध्ये घोळयाने घुसून सुपारीच्या फुलांसह बाजलेली सुपारीची छोटी-छोटी कोवळी सुपार्या खाऊन नासधूस करतात आणि सुपारीच्या पेंडी खाली पाडतात, त्यामुळे कर्ज काढून बागायत करणार्या बागायतदाराचे खूप नुकसान होते. शासन पातळीवर यावर उपाययोजना व्हावी. - संतोष दातार, बागायतदार
माझ्या केळीच्या बागेत मोठ्या संख्येने माकडे येऊन नव्याने व्यायलेल्या केळीचे फड तोडून टाकून केळीच्या फुलांसह संपूर्ण केळीच्या फडाची नुकसानी करतात. वर्षभर एवढी मेहनत करून हाती काहीही लागत नाही आणि वनविभाग याकडे दुर्लक्ष करते. -अंकुश नटे, बागायतदार, गवळवाडी