‘सिडको’ भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणारे तिघे अटकेत

04 Dec 2024 16:50:27
 new mumbai
 
पनवेल |‘सिडको’ने संपादीत केलेल्या जमिनीवर आणि भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणार्‍या डंपर चालकांची ‘सिडको’कडून धरपकड सुरुच आहे. ‘सिडको’च्या पथकाने गव्हाण येथील एमटीएचएल लेबर कॅम्पलगत डेब्रीज टाकण्याच्या तयारीत असलेल्या ३ डंपरवर कारवाई करुन ते जप्त केले आहेत. तसेच सदर डंपरवरील चालकांना ताब्यात घेतले आहे.
 
‘सिडको’ने संपादीत केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठया प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रीज मानवी आरोग्यास धोकादायक आणि पर्यावरणास हानीकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘सिडको’च्या भूखंडावर टाकण्यात येणार्‍या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने ‘सिडको’चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग आणि पोलीस पथकाकडून ‘सिडको’च्या जमिनीवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणार्‍या डंपर चालकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.
 
गव्हाण येथील एमटीएचएल लेबर कॅम्प लगत ‘सिडको’च्या जमिनीवर मानवी आरोग्यास हानिकारक असलेले डेब्रीज टाकण्यात येत असल्याची माहिती ‘सिडको’च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ‘सिडको’च्या पथकाने गव्हाण येथे धाव घेतली असता, त्याठिकाणी ३ डंपरमधील मानवी आरोग्यास आणि हानिकारक असलेले डेब्रीज विनापरवाना खाली करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर ‘सिडको’च्या पथकाने तिनही डंपर ताब्यात घेऊन डंपरचालक इरसाद झियाउद्दीन शेख, अकील शकील अहमद, शकील अहमद मोहम्मद सुल्तान अन्सारी यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई नंतर ‘सिडको’च्या पथकाने बेकायदेशीरपणे डेब्रीज टाकणार्‍यांविरुध्द उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0