कर्जत पोस्ट कार्यालयाचा गलथान कारभार , स्थानिक ग्रामस्थांकडून वरिष्ठ कार्यालयास पत्र

05 Dec 2024 19:42:50
 KARJT
 
कर्जत । कर्जत पोस्ट कार्यालयाकडून पोस्ट कार्यालयामध्ये विविध कामांसाठी येणार्‍या ग्राहकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे पोस्ट कार्यालयाच्या अनागोंदी कामाबद्दल पोस्ट खात्याशी संबंधित असलेल्या रहिवाशांनी  नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान कर्जत पोस्ट कार्यलयाशीसंबंधित असलेल्या लोकांनी नवीन पनवेल येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र पाठवून आपल्या दैनंदिन तक्रारी कळविल्या आहेत. कर्जत येथील पोस्ट कार्यालयामध्ये निर्माण झालेल्या या समस्यांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
 
पोस्ट ऑफिस ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची सेवा असल्यामुळे त्याचा कार्यक्षमतेने आणि सुरळीतपणे चालवणं आवश्यक आहे. सध्या या कार्यालयात स्टाफ कमी, तांत्रिक अडचणी, बचतगट एजंटांच्या कामकाजाचा गोंधळ, वीजपुरवठा खंडित झाल्यावर पर्यायी उपायांचा अभाव तसेच एटीएम कार्ड सेवेचा अभाव या समस्या असल्याने ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.
 
कर्मचारी वर्ग वाढवणे, स्वतंत्र खिडक्या उपलब्ध करून देणे, बचतगट एजंटांसाठी ठराविक वेळ निश्चित करणे, तसेच इन्व्हर्टर आणि एटीएम कार्ड सेवा त्वरित सुरू नसल्याने ग्राहकांशी होणारी गैरसतोय कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे कर्जत पोस्ट कार्यालयाच्या कारभाराला कंटाळून आपली नाराजी पनवेल यायेथील वरिष्ठ कार्यालयाला कळविली आहे. त्या तक्रारी अर्जामध्ये ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे अशी मागणी केली आहे. त्यात अधिकार्‍यांनी तातडीने उपाययोजना करून, या समस्यांचे निराकरण करावे अशी अपेक्षा आहे. यामध्ये यावर भर देणे आवश्यक आहे अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करीत आहेत. 
 
 
Powered By Sangraha 9.0