महाराष्ट्रात देवेंद्रपर्व सुरु ,मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की..,

06 Dec 2024 12:45:13
 Mumbai
 
मुंबई । महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीदेवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हाएकदा ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात झाली आहे. या शपथविधीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थितीहोती. फडणवीस यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणिअजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वेमुख्यमंत्री बनले आहेत.
 
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपातदेवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम गुरुवारी (5 डिसेंबर) पार पडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हेजवळपास निश्चित होते. पण तरीदेखील महायुतीत अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडी, तसेच राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने घेतलेला वेळ यामुळे शपथविधीचा कार्यक्रम रखडला.
 
अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 13 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयगृहमंत्री अमित शाह हे स्वत: उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणिउपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संत-महंतांनीदेखीलहजेरी लावली.
 
त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेचक्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणार्‍या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनीआज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात झाली आहे.
 
या नव्या पर्वात देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना, जलयुक्त शिवार योजना अशा महत्त्वकांक्षी योजनांना नवे वळण देतात का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हा अत्यंत महत्त्वाचाप्रश्न आहे. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार कसा मिळेल, राज्यातील विविधभागांमध्ये पाणीटंचाईचे संकट कसे दूर होईल, शेतकर्‍यांना हवा तितका हमीभाव देण्यापासून मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणांच्या मुद्द्यांचे मोठें आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.
 
देवेंद्र फडणवीस हे तसे हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांनी याआधी 2014 ते 2019 असे सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्यपणे पार पाडून स्वत:ची क्षमता याआधीच सिद्ध केली आहे. त्यांची पक्ष संघटनेत असलेली पकड, प्रशासनात असलेला दबदबा आणिविविध प्रश्नांबाबत असणारे ज्ञान यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राची जनता खूप आशेने पाहत आहे. त्यामुळे या नव्या देवेंद्र पर्वात ते कशाप्रकारे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामे करतात, महाराष्ट्रात कशाप्रकारे नवे उद्योगधंदे आणतात, जीवनाश्यक वस्तूंचे भाव कसे नियंत्रणात ठेवतात हे पाहणे महत्त्वाचे असेल.
 
त्यांच्या या नव्या पर्वासाठी कोट्यवधी देशवासीयांकडून सध्याच्या घडीला त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. भाजपचे नेतृत्व करणार्‍याफडणवीसांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळही पडली आहे. 2014 ते 2019 पर्यंत पूर्ण 5 वर्षे फडणवीस मुख्यमंत्री होते. पुन्हा येईन म्हणत 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार फडणवीसांनी निवडूनही आणले. मात्र उद्धव ठाकरेकाँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले आणि फडणवीसांचे स्वप्न भंगले. शिंदेंच्या बंडानंतर 2022 मध्येही शिंदेच मुख्यमंत्री झाले. मात्र आता ऐतिहासिक विजयानंतर, फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले आहेत.
 
शेवटपर्यंत सस्पेन्स...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांचा शपथविधी सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. सिनेक्षेत्रासहविविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावलेली होती.
 
हा कार्यक्रम जितका भव्यदिव्य राहिला तितकाच तो सस्पेन्स वाढवणारा देखील राहिला. शपथविधी सोहळ्यात मंचावर देवेंद्र फडणवीसयांच्या डाव्या बाजूला अजित पवार बसले. तर उजव्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले. त्यांच्या उजव्या बाजूला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि त्यांच्या उजव्या बाजूला एकनाथ शिंदे हे बसले होते.
 
राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा होईल, असे वाटत असताना सूत्रसंचालकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि मोठ्या सस्पेन्सवर पडदा पडला. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Powered By Sangraha 9.0